Video
Loutolim Case: अखेर कन्हैयाकुमार हिट अँड रन प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंद!
Murder Case: कन्हैयाकुमार मृत्यू अपघात नव्हे, तर घातपाताचाच प्रकार. अखेर ‘गाेमन्तक’चे वृत्त ठरले खरे.
कन्हैयाकुमार मृत्यूप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी अखेर खूनाचा गुन्हा नोंद केला आहे. गळ्यावर आणि पोटावर तीक्ष्ण हत्यारांनी केलेले वार सापडूनही पोलीस गुन्हा नोंद का करत नाहीत यावरुन पोलिसांवर सवाल उपस्थित केले जात होते.
25 जून रोजी लोटली येथे वेर्णा औद्योगिक वसाहतीजवळ मायणा-कुडतरी पाेलिसांना कन्हैयाकुमार मोंडलचा (३२) मृतदेह सापडला हाेता. त्याच्या अंगावरून वाहन गेल्याचे दिसून आल्याने पाेलिसांकडून सुरूवातीला हे प्रकरण ‘हिट ॲण्ड रन’ म्हणून नाेंदविले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.