Casino Oppose: मोरजीतील बिग डेडी कॅसिनोला आमदार तसेच स्थानिकांचाही विरोध

Morjim Casino Dispute: कान्नाईक वाडा मोरजी येथील श्री काळोबा देवस्थान परिसरात कॅसिनो उभारण्यास स्थानिकांचा विरोध आहे. आपण स्थानिकांसोबत आहे, असे आमदार जीत आरोलकर यांनी स्‍पष्‍ट केले.

Morjim Big Daddy Casino Dispute

मोरजी: कान्नाईक वाडा मोरजी येथील श्री काळोबा देवस्थान परिसरात कॅसिनो उभारण्यास स्थानिकांचा विरोध आहे. आपण स्थानिकांसोबत आहे, असे आमदार जीत आरोलकर यांनी स्‍पष्‍ट केले. स्थानिकांना एखादा प्रकल्प नको असेल तर आपण स्थानिकांसोबत राहणार आहे. शिवाय या परिसरात इमारत उभारण्यासाठी दिलेली परवाने त्वरित मागे घ्यावे यासाठी आपण मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि संबंधित खात्याला पत्र दिले आहे, अशी माहिती आमदार जीत आरोलकर यांनी दिली.

कान्नाईक वाडा मोरजी येथील श्री काळोबा देवस्थान परिसरात हॉटेलवजा कॅसिनो उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झालेल्‍या आहेत. शिवाय त्या परिसरातील मोठ्या प्रमाणात जमिनी विकत घेण्यासाठी झपाटा लावलेला आहे. त्यामुळे स्थानिकांची जी काही घरे आहेत आणि ही घरे कॅसिनोसाठी अडथळा ठरत असलेली घरेही जमीन प्लान वरून नाहीशी केल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. आमचा या कॅसिनोला विरोध असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Bombay High Court Goa Bench Casino Order
morajit road traffic problem today
Goa Mandovi River Casino Dispute
New Casino Vessel Permission
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com