Borim Fire News: देऊळवाडा बोरी येथे ज्वेलरी शॉपला आग

Jewellery Shop Catches Fire Borim: आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फोंडा: तालुक्यातील देऊळवाडा बोरी येथे असलेल्या गजंतलक्ष्मी या सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानाला मंगळवारी अचानक आग लागली. या दुर्घटनेत दुकान मालक संकेत कारेकर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आगीची माहिती मिळताच फोंडा अग्निशमन दलाचे अधिकारी सुशील मोरजकर व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत दुकानातील बहुतेक साहित्य जळून खाक झाले. यामध्ये एसीसुद्धा पूर्णतः भस्मसात झाला आहे.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com