Illegal Structures Demolished: घर पाडल्याने कुटुंबावर संकट; सुकुर पर्वरी येथे बेकायदेशीर बांधकाम जमीनदोस्त

Socorro Porvorim Demolition: न्यायालयाने ग्रामपंचायतीला १० फेब्रुवारी २०२५ नंतर हे बांधकाम पाडण्याचे निर्देश दिले होते

पर्वरी: मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या आदेशानुसार पर्वरीतील सुकूर येथे असलेले एक अनधिकृत बांधकाम गुरुवार (दि.२७) रोजी जमीनदोस्त करण्यात आले. सुकूर ग्रामपंचायतीने मामलेदार, पंचायत सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे.

उच्च न्यायालयाने यापूर्वीच हे बांधकाम हटवण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने ग्रामपंचायतीला १० फेब्रुवारी २०२५ नंतर हे बांधकाम पाडण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज ही कारवाई करण्यात आलीये. अधिकाऱ्यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखत ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली. कारवाईमुळे पर्वरीतील अनधिकृत बांधकामांना आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून ग्रामपंचायतीने ही कारवाई केली आहे.

मात्र या प्रकरणी निलेश चारी नावाच्या इसमाचे घर जमीनदोस्त केल्या प्रकरणी त्यांच्या कुटुंबाने संताप व्यक्त केला आहे. अचानक घर पडल्याने आता आम्ही बेघर झालोय, नेमकं कुठे जावं असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाल्याचं परिवाराचं म्हणणं आहे. पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांच्या विरोधात असलेल्या कॅम्पेनला पाठिंबा दिल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप निलेश चारी आणि परिवाराने केलाय. कायदा हा सर्वांसाठी एकाच असला पाहिजे, यात कुणावर अन्याय होऊ नये असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com