Illegal Fishing: गोव्यात बेकायदा मासेमारीवर मोठी कारवाई; 13 ट्रॉलर जप्त केल्याने खळबळ VIDEO

Illegal Fishing In Goa: गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर बेकायदा मासेमारी करणाऱ्यांविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने कडक पाऊल उचलले.

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर बेकायदा मासेमारी करणाऱ्यांविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने कडक पाऊल उचलले. नियमांचे उल्लंघन करुन मासेमारी करणाऱ्या 13 ट्रॉलरवर कारवाई करत ते जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे बेकायदा मासेमारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शासनाने निश्चित केलेल्या नियमावलीबाहेर जाऊन आणि प्रतिबंधित क्षेत्रांत मासेमारी होत असल्याच्या तक्रारींनंतर ही धडक मोहीम राबवण्यात आली.

जप्त केलेले ट्रॉलर सध्या प्रशासनाच्या ताब्यात असून संबंधित मालकांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. गोव्यातील स्थानिक मासेमारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि समुद्री पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरु राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com