1500 आसन क्षमतेसह 'इफ्फी 2025' चा उद्घाटन सोहळा; मुख्यमंत्र्यांनी केली तयारीची पाहणी

IFFI 2025 Goa opening ceremony: राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजी येथील जुन्या गोवा वैद्यकीय महाविद्यालय संकुलाची पाहणी केली.

आगामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) २०२५ च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजी येथील जुन्या गोवा वैद्यकीय महाविद्यालय (GMC) संकुलाची पाहणी केली. यंदा इफ्फीचे उद्घाटन 'ओपन एअर' इव्हेंट म्हणून होणार आहे. इफ्फी संचालक आणि गोवा सरकारच्या मंत्र्यांच्या शिफारशीनुसार, सुमारे १,५०० लोकांच्या आसनक्षमतेसह हा उद्घाटन सोहळा होणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, यंदा गोमंतकीय नागरिक या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा आणि रेड कार्पेट इव्हेंट तीन तासांपर्यंत खुल्या मैदानावर अनुभवू शकतील. विशेष म्हणजे, मागील वर्षांच्या तुलनेत यंदा 'इफ्फी'ने मुख्य उद्घाटन सोहळा बंदिस्त सभागृहात न ठेवता, शिगमो आणि कार्निव्हलच्या चित्ररथांवर आधारित परेड जुन्या जीएमसी संकुलात आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com