"I BRAKE For SNAKE" गोवा वन खाते आणि शाळेचा सर्पसंवर्धनासाठी अनोखा उपक्रम

Goa snake conservation campaign: या उपक्रमाचा मुख्य उद्देश रस्त्यांवर येणाऱ्या सापांचे प्राण वाचवणे आणि वाहनचालकांमध्ये सर्पसंवर्धनाचे महत्त्व रुजवणे हा होता.

डिचोली: नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर सर्पांविषयी जनजागृती करण्यासाठी गोवा वन खाते आणि सरकारी प्राथमिक विद्यालय, पुनर्वसन-साळ, डिचोली यांच्या संयुक्त विद्यमाने "I BRAKE For SNAKE" या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश रस्त्यांवर येणाऱ्या सापांचे प्राण वाचवणे आणि वाहनचालकांमध्ये सर्पसंवर्धनाचे महत्त्व रुजवणे हा होता.

यावेळी विद्यार्थ्यांनी "मला व माझ्या सवंगड्यांना गाडेखाली चिरडू नका!" असे हृदयस्पर्शी संदेश फलक हातात घेऊन, गोवा-दोडामार्ग येथील माजी टोल नाक्याजवळ वाहनचालकांचे लक्ष वेधले. वनखात्याचे प्राणी संवर्धक विराज परवार यांनी "नागपंचमी – परंपरेपासून संवर्धनापर्यंत" या संकल्पनेवर बोलताना सर्पांविषयीचे गैरसमज दूर केले.

सर्पतज्ज्ञ निर्मल कुलकर्णी आणि इतर संस्थांच्या सहकार्याने तसेच शिक्षक संकेत नाईक यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला. सापांना रस्त्यावर दिसल्यास गाडी थांबवून त्यांना मार्ग देण्याचा संदेश देत, हा उपक्रम निसर्गसंवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com