Video
Heavy Rain in Goa: मुसळधार पावसामुळे बाणावलीतील भातशेतीचे नुकसान
Goa Rain: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत झाले आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणांहून पडझडीच्या घटना समोर येतायेत. तर या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बाणावलीमध्ये झालेल्या पावसामुळे भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून बाणावलीत पावसानं धूमशान घातलं आहे. एका क्षणात पावसानं बाणावतील शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं करुन टाकलं. असाच पाऊस सुरु राहिल्यास शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.