Goa Congress Protest: महिलांना सुरक्षा देण्यात राज्य सरकार अपयशी, वास्को अत्याचार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक

Goa Pradesh Youth Congress Protest: एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेचा आज प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला.

Vasco minor girl assault protest

पणजी: वास्को येथील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा आज प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला. येथील आझाद मैदानावरील शहीद स्मारकासमोर निदर्शने करीत राज्य सरकार महिलांना सुरक्षा देण्यात अपयशी ठरल्याची टीका युवकांनी केली.

प्रदेश युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष महेश नडार यांच्या अध्यक्षतेखाली ही निदर्शने करण्यात आली. निषेध कार्यक्रमात सहभागी झालेल्या युवकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. राज्यातील भाजप सरकारच्या काळात महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत, लहान मुलींवरही अत्याचाराच्या घटना घडत आहेत. कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे. अशा घटनांमुळे राज्यातील महिलांकडे पर्यटकांकडून वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे, असा आरोप युवतींनी केला. महिलांना सुरक्षितता देण्यात अपयशी ठरलेल्या या सरकारने आता मुलींना स्वरक्षणासाठी शाळेत कराटे क्लासेस सुरू करावेत, अशी सूचनाही या सदस्यांनी केली.

‘पोलिसांचा धाक उरला नाही’

नडार म्हणाले, महिलांना सुरक्षित वाटण्यासाठी पोलिसांचा धाक असणे आवश्यक आहे, पण तसा धाक अजिबात उरला नाही. गुन्हेगारांना कायद्याची कोणतीही भीती उरली नाही. महिला सुरक्षा हा केवळ भाषणबाजीचा विषय ठरला आहे. सरकार त्यावर भरपूर बोलत असते, पण प्रत्यक्षात कृती मात्र काहीच नाही असेच दिसते. राज्यातील वाढलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून, महिलांवरील वाढलेल्या गुन्ह्यांची संख्या ही चिंताजनक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com