Digital Challan in Goa: 1 मार्चपासून गोव्यात 'चिरीमिरी' बंद! वाहतूक चलन दंड भरणा केवळ डिजिटल पेमेंटद्वारे

Digital Fine Payment In Goa: डिजिटल पेमेंट हे डेबिट, क्रेडिट कार्ड, ई-चलन यंत्रावरील क्यूआर कोड अथवा केंद्रीय वाहतूक खात्याच्या संकेस्थळावरून करता येईल, असे आदेशात नमूद केले आहे.

पणजी: राज्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास १ मार्च २०२५ पासून कारवाई झालेल्या वाहनचालकांना जारी करण्यात आलेल्या चलनाची दंडात्मक रक्कम रोखीने न भरता केवळ डिजिटल पेमेंट पद्धतीचा वापर करून भरावी लागणार आहे. ही दंडाची रक्कम भरण्यासाठी रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही. यासंदर्भात वाहतूक पोलिस उपअधीक्षक सुदेश नार्वेकर यांनी आदेश जारी केला आहे. डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी तसेच चलनाची रक्कम भरण्यात सुलभता यावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. डिजिटल पेमेंट हे डेबिट, क्रेडिट कार्ड, ई-चलन यंत्रावरील क्यूआर कोड अथवा केंद्रीय वाहतूक खात्याच्या संकेस्थळावरून करता येईल, असे आदेशात नमूद केले आहे. रोख रकमेच्या अफरातफरीचे प्रकार घडू नयेत, यासाठीच वाहतूक चलनचे डिजिटल पेमेंट करण्याचा विचार सुरू होता. त्याची अंमलबजावणी १ मार्चपासून करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

डिचोलीतील घटनेनंतर सतर्कता

काही दिवसांपूर्वी डिचोली पोलिस स्थानकात रोख रकमेद्वारे जमा झालेल्या चलनाच्या पैशांचा गैरव्यवहार झाला होता. याची गंभीर दखल पोलिस खात्याने घेतली होती. एका महिला पोलिसाने वाहन चलनाची रक्कम जमा न करताच ती स्वतःसाठी वापरली होती. या महिला पोलिस कर्मचाऱ्याने १७.३० लाख रुपयांची अफरातफर केल्याचे आरोप होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com