Carlos Ferreira On Tourism: खंवटेंचे पर्यटन मंत्रीपद काढून टाकावे! आमदार फेरेरांनी का केली मागणी? पहा Video

Carlos Ferreira: गोव्याचा प्रचार करण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लूअन्सरची गरजच का आहे?, असे खडेबोल आमदार कार्लुस फेरेरा यांनी सरकारला सुनावले.

म्हापसा: गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक व पर्यटकांमध्ये संघर्ष वाढला असून परिणामी खून-मारहाणीच्या घटना येथील पर्यटनासाठी मोठा चिंतेचा विषय बनला आहे. याच पार्श्वभूमीवर, हळदोणेचे काँग्रेस आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी गोव्यातील पर्यटन क्षेत्रातील अपुर्‍या साधनसुविधा व प्रशासकीय धोरणांना जबाबदार धरले. तसेच, पर्यटनमंत्रीच बदलण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

गोव्यातील पर्यटकांच्या संख्येत घट झाली असून पर्यटनमंत्री व सरकार याला जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली. सोमवारी आमदार फेरेरा हे मयडे येथे एका कार्यक्रमानंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते. फेरेरा पुढे म्हणाले की, पर्यटन खाते न्यू-यॉर्कमध्ये कोट्यवधी रुपये खर्चून तिथे जाहिरातबाजी करते. हे खूपच हास्यापद आहे.

सोशल मीडिया इन्फ्‍ल्यूएन्सर हवेतच का?

गोव्याचा प्रचार करण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लूअन्सरची गरजच का आहे?, असे खडेबोल आमदार कार्लुस फेरेरा यांनी सरकारला सुनावले. मुळात करदात्यांच्या पैशांची नासाडी करणे अयोग्य असल्याचे ते म्हणाले. राज्यातील साधनसुविधांमध्ये घट झाल्याने पर्यटक गोव्याऐवजी इतर क्षेत्रांना पसंती देताहेत. पर्यटन खाते हे पर्यटन प्रोत्साहन मंडळाला मार्गदर्शन मिळावे म्हणून निविदा काढते. ही फसवणूक आहे. हे म्हणजे, सल्लागारांच्या आडून पैशांची उधळपट्टी आहे,असेही फेरेरा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com