Cyber Crime: सायबर भामट्यांविरुद्ध गोवा पोलिसांचा धडाका! 43 पथकांची 16 राज्यांत मोहीम, 24 जणांना बेड्या; 8 कोटींचा घोटाळा उघड

Goa Police Cyber Crime Action: सायबर गुन्हेगारीविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाचा अवलंब करत गोवा पोलिसांनी आंतरराज्यीय ‘सायबर व्हिजिल २.०’ या विशेष मोहिमेअंतर्गत १६ राज्यांमध्ये २४ सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे, तर २० जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

सायबर गुन्हेगारीविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाचा अवलंब करत गोवा पोलिसांनी आंतरराज्यीय ‘सायबर व्हिजिल २.०’ या विशेष मोहिमेअंतर्गत १६ राज्यांमध्ये २४ सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे, तर २० जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

नोव्‍हेंबर महिन्‍यातील या कारवाईमुळे ३७ सायबर गुन्हे उघडकीस आले असून, यामध्ये सुमारे ८ कोटी २१ लाख ६७ हजार ९९९ रुपये (८,२१,६७,९९९.७३) इतक्या रकमेची फसवणूक उघडकीस आली आहे. ४३ पोलिस पथकांच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता, दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक अक्षत आयुष आणि सायबर विभाग पोलिस अधीक्षक जिवबा दळवी यांच्या नेतृत्‍वाखाली कारवाई सत्र झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.