Land Ownership: मालकीच्या जमिनींची नोंद महसुली कागदपत्रांत करण्याची प्रक्रिया सुरू

Goa Government Land Record Update: मुक्तीनंतर प्रथमच सरकारने आपल्या मालकीच्या, ताब्यातील जमिनींची नोंद महसुली कागदपत्रांत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

मुक्तीनंतर प्रथमच सरकारने आपल्या मालकीच्या, ताब्यातील जमिनींची नोंद महसुली कागदपत्रांत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे सरकारी जमीन कसणारे आणि सरकार यांच्यात नजीकच्या काळात संघर्ष निर्माण होऊ शकतो.

सरकारी मालकीच्या जमिनीवरील घरांचे बांधकाम नियमित करण्याचा निर्णय घेतेवेळी केलेल्या अभ्यासात सरकारच्या लक्षात आले होते, की अनेक ठिकाणी सरकारी मालकीची जमीन कोणाच्या तरी ताब्यात आहे.

काही ठिकाणी सरकारने जमीन संपादित केली खरी; पण महसुली नोंदीत त्या खात्याची नोंदच नाही. त्यामुळे महसुली दस्तावेजात म्हणजे १/१४ च्या उताऱ्यात जमीनमालक या रकान्यात गोवा सरकार, अशी नोंद करण्यासाठी खाते प्रमुखांनी कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश सरकारने दिले आहेत.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com