Goa Firing Case: तेरेखोल नदीत रेती उपसा करणाऱ्या मजुरांवर गोळीबार; दोन मजूर गंभीर जखमी

Terekhol Sand Extraction Firing Case: जखमी झालेल्यांत रमेश पासवान व लालबहादूर गोंड अशी या कामगारांची नावे आहेत.

पेडणे: उगवे येथे सोमवारी मध्यरात्री तेरेखोल नदीत होडीतून रेती उपसा करणाऱ्या मजुरांवर झालेल्या गोळीबारात दोन मजूर गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमी झालेल्यांत रमेश पासवान व लालबहादूर गोंड अशी या कामगारांची नावे आहेत. या जखमींमधील एकाच्या मानेला घासून बंदुकीच्या गोळ्या गेल्या तर दुसऱ्या कामगाराच्या दंडाला गोळ्या लागलेल्या आहेत. त्यातील एकावर तातडीची शस्त्रक्रिया सुरू आहे.

घटनेची माहिती सकाळी सर्वत्र पसरल्यावर लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. हा प्रकार कसा घडला या संदर्भात तर्क काढले जात आहेत. परिसरात बेकायदा वाळू उत्खनन होते. ते मूळ कारण आहे का, याचाही अदमास घेतला जात आहे.

अज्ञात हल्लेखोराचा शोध सुरू

गोळीबार कुणी केला?, नदीतून रेती काढण्यावर बंदी असताना नदीत कसा काय रेती उपसा करण्यात येत होता, अशा बाबींचा पेडणे पोलिस शोध घेत आहेत. गोळीबार करणाऱ्या अज्ञाताचा पोलिस शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

POCSO Case Goa
Goa Tourist Murder Case
Goa bench Fire Case
Hazmat Response Vehicle Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com