Cyber Crime: 'डिजिटल अरेस्ट'चा धाक दाखवून 42 लाख उकळले; महाराष्ट्रातील 20 वर्षीय तरूण पोलिसांच्या जाळ्यात

Goa Digital Arrest Scam: गोव्यात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गोव्यात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली काणकोण येथील एका नागरिकाकडून तब्बल 42 लाख 60 हजार 94 रुपये उकळल्याप्रकरणी गोवा सायबर क्राइम पोलिसांनी महाराष्ट्रातील एका 20 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. तेजस नरहरे (वय 20, रा. नांदेड, महाराष्ट्र) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय असून, त्यादृष्टीने तपास सुरू आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी तक्रारदाराशी संपर्क साधताना आपण दूरसंचार विभाग आणि क्राइम ब्रांचशी संबंधित अधिकारी असल्याचे भासवले. त्यानंतर विविध कारणे सांगून संबंधित व्यक्तीला घाबरवण्यात आले. त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, अशा प्रकारची भीती निर्माण करून त्याच्याकडून पैशांची मागणी करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com