गुन्हे शाखेने म्हापसा येथील एकतानगर भागात सुरू असलेल्या ऑनलाईन क्रिकेट सट्टेबाजीच्या अड्ड्यावर छापा टाकून चौघांना रंगेहात अटक केली आहे. श्रीलंकेत सुरू असलेल्या ‘ट्राय नेशन ए’ क्रिकेट मालिकेतील भारत-अ विरुद्ध श्रीलंका-अ या सामन्यावर हे संशयित ऑनलाईन सट्टा लावत होते.
उमाशंकर जोशी (४२, मध्य प्रदेश), राहुल खोत (२५, हरियाणा), अन्वेश सोनी (३०, मध्य प्रदेश) आणि फैजान शेख (२२, मध्य प्रदेश) यांना अटक केली आहे. २१ जून २०२६ रोजी गुन्हे शाखेला म्हापसा परिसरात ऑनलाईन सट्टेबाजी सुरू असल्याची विश्वासार्ह माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने एकतानगर - म्हापसा येथील एका व्हिलावर छापा टाकला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.