Russian Nationals Arrested: व्हिसा संपला तरी ठिय्या! दोन रशियन नागरिकांवर पोलिसांची मोठी कारवाई; बेकायदेशीर वास्तव्यामुळे अटक

illegal stay after visa expiry: व्हिसाची मुदत संपल्यानंतरही बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या रशियन नागरिक बोरिस गुदकोव्ह (४७) आणि सर्गेई सिल्वान्स्की (४४) यांना गुन्हे शाखेने अटक केली.

पणजी: व्हिसाची मुदत संपल्यानंतरही बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या रशियन नागरिक बोरिस गुदकोव्ह (४७) आणि सर्गेई सिल्वान्स्की (४४) यांना गुन्हे शाखेने अटक केली. ही कारवाई रविवारी शिवोली येथील वाडी कारे परिसरातील एका घरात करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरिस गुदकोव्ह याच्या पासपोर्टची मुदत २८ ऑक्टोबर २०३४ पर्यंत वैध असली, तरी त्याच्या व्हिसाची मुदत २ एप्रिल २०२६ रोजीच संपली होती. दुसरा संशयित सर्गेई सिल्वान्स्की हा कोणत्याही वैध व्हिसाशिवाय भारतात राहत असल्याचे तपासात उघड झाले.

संशयितांवर ‘इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट, २०२५’च्या कलम ३ चे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम २३ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून दोन्ही संशयितांना औपचारिकपणे अटक केली असून, त्याबाबतची माहिती पणजी येथील ‘एफआरआरओ’मार्फत रशियन दूतावासाला देण्यात येत आहे. दरम्यान, दोघांचीही वैद्यकीय तपासणीसाठी करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com