Goa Chaturthi Market: डिचोलीच्या बाजारात माटोळीच्या खरेदीसाठी झुंबड, राज्यात गणेशोत्सवाचे वातावरण!

Ganesh Chaturthi Celebration Goa: गणेश चतुर्थीचा सण अगदी तोंडावर येऊन ठेपला असल्याने, प्रत्येक गणेश भक्ताच्या मनात उत्साह संचारला आहे.

डिचोली: गणेश चतुर्थीचा सण अगदी तोंडावर येऊन ठेपला असल्याने, प्रत्येक गणेश भक्ताच्या मनात उत्साह संचारला आहे. अवघ्या एक दिवसावर आलेल्या या सणासाठी राज्यभर बाजारपेठांमध्ये लगबग सुरू झाली आहे. विशेषतः, डिचोलीच्या बाजारात गणेश चतुर्थीची खास खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.

गोव्यातील गणेशोत्सवामध्ये 'माटोळी'ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे विविध प्रकारची रानफळे, फुले आणि पानांच्या माळांनी बाजारपेठा सजल्या आहेत. पारंपरिक पद्धतीनुसार माटोळीसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. डिचोलीतील स्थानिक विक्रेत्यांनी विविध प्रकारची फळे, पाने, फुलांच्या माळा आणि इतर सजावटीच्या वस्तू विक्रीसाठी आणल्या आहेत. यामुळे बाजारात उत्साहाचे आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले असून, गणेशोत्सवाची खरी सुरुवात झाल्याचे जाणवत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com