Goa Assembly: 'सरकारचे पितळ उघडं पडेल म्हणून...'; सरदेसाईंनी CM सावंतांना घेरले

Vijai Sardesai & Carlos Alvares Ferreira: गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा आणि आमदार विजय सरदेसाई आणि कार्लुस फेरेरा यांनी पत्रकार परिषद घेऊन सावंत सरकारचा चांगलाच समाचार घेतला.

आजपासून (15 जुलै) गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. विरोधकांनी पहिल्याच दिवशी सत्ताधारी पक्षाला राज्यातील अनेक प्रश्नांवरुन फैलावर घेतले. मग यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेले आसगाव घर मोडतोड प्रकरण असो की मग सरकारचा इतर कामातील हालगर्जीपणा असो... यातच, गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा आणि आमदार विजय सरदेसाई आणि कार्लुस फेरेरा यांनी पत्रकार परिषद घेऊन सावंत सरकारचा चांगलाच समाचार घेतला. सरदेसाई म्हणाले की, आमच्या प्रश्नांमुळे सरकारचे पितळ उघडं पडेल या भितीपोटी सभागृहात प्रश्नोत्तराचा तास सरकारने शिताफीने रद्द केला. तर आमदार कार्लुस फेरेरा यांनीही पत्रकार परिषदेतून सरकारवर सडकून टीका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Carlos Ferreira On Hat Katro Khamb
vijai sardesai warns goa govt
mla vijai sardesai slams goa govt
MLA Vijai Sardesai Court Warning
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com