Amthane Dam: 'आमठाणे' जलाशयात वाढला साठा, 4 दिवसांत पाण्याची पातळी एक मीटरने वाढली

Amthane Dam Water Level Rises: गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे डिचोलीतील आमठाणे जलाशयातील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

डिचोली: गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे डिचोलीतील आमठाणे जलाशयातील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत जलाशयातील पाण्याची पातळी ४६.९ मीटरपर्यंत पोहोचली असून, चार दिवसांत ती जवळपास एक मीटरने वाढली आहे.

आमठाणे जलाशयावर उत्तर गोव्याचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. जूनमध्ये अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने जलसाठ्याबाबत चिंता व्यक्त होत होती. मात्र गेल्या आठवड्यापासून पावसाने जोर धरल्याने ही चिंता दूर झाली आहे.

जलसाठा नियंत्रित

मेणकुरे-धुमासे पंचायत क्षेत्रात येणाऱ्या आमठाणे धरणाचे कार्यक्षेत्र ५८२ हेक्टर मीटर एवढे आहे. धरणावरील सर्व्हिस गेटसह दुरुस्तीकाम पूर्ण झाल्यानंतर गेल्या जानेवारी महिन्यात या धरणातील जलसाठ्याची पातळी नियंत्रित करण्यात आली होती. मात्र त्यानंतर पाण्याची पातळी कमी होऊन सभोवतालचे पात्र कोरडे पडले होते. आता या जलाशयात मुबलक साठा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com