GMR Revenue Holiday: कोरोनात विमानतळ 10 दिवस बंद 180 दिवसांची सवलत का दिली? विजय सरदेसाई

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: मोपा विमानतळावरील सर्व महसुलाच्या ३६.९९% वाटा सरकारला मिळाला पाहिजे.

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा कोविड काळात केवळ २० दिवस बंद होता. तर मग महसूल देण्यासाठी त्यांना १८० दिवसांची सवलत का दिली गेली? असा सवाल फातोर्थ्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी आज विधानसभेत उपस्थित केला.

सरकारच्या या चुकीच्या निर्णयामुळे राज्याचा २०० कोटींचा महसूल बुडाला, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला सरदेसाई यांनी हा प्रश्न विचारला होता.

मोपा विमानतळावरील सर्व महसुलाच्या ३६.९९% वाटा सरकारला मिळाला पाहिजे. तो मिळाला तर सरकारला किती रक्कम मिळेल याचा अंदाज सरकारला आहे का? असा सवाल विजय सरदेसाईंनी उपस्थित केला.

विमानतळावर किती महसूल गोळा होतो ही आकडेवारी ७ डिसेंबर नंतरच समजणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील खटल्यामुळे ६३४ दिवस प्रकल्पाला उशीर झाला तर कोविड काळातील उशीर १८० दिवस आहे. यामुळे सरकारने महसुलाचा वाटा देण्यासाठी कंपनीला ७ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com