VIDEO: गोमेकॉत उंदरांचा हैदोस, रुग्णांच्या पायांना चावा! आमदार बोरकरांनी सरकारला घेरलं, तातडीनं पेस्टकंट्रोलची मागणी

GMC Goa Rat Menace: रुग्ण बरे होण्यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) येतात; उंदरांनी पायाला चावा घेऊन पुन्हा आजारी पडण्यासाठी नव्हे.

रुग्ण बरे होण्यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) येतात; उंदरांनी पायाला चावा घेऊन पुन्हा आजारी पडण्यासाठी नव्हे. त्यामुळे गोमेकॉतील उंदरांच्या उपद्रवाची सरकारने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने पेस्टकंट्रोल करून रुग्णांना या त्रासातून मुक्त करावे, अशी मागणी आमदार वीरेश बोरकर यांनी शून्य प्रहरावेळी केली.

गोमेकॉत अलीकडे उंदरांचा वावर आढळून येत असल्याचे बोरकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. रुग्णालयातील कारभारावर देखरेख ठेवण्यासाठी व्हिजिटिंग समिती नेमण्याची तरतूद आहे. मात्र, या समितीची प्रत्यक्षात अंमलबजावणी होते का, याचीही सरकारने पाहणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com