Goa Murder Case: दारुच्या बाटलीसाठी मित्राचा खून, संशयिताला अटक

Goa Murder Case: स्थानिक आमदार आंतोन वाझ यांनी घटनास्थळी दाखल होत संशयिताला तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती.

कुठ्ठाळीत निर्माणाधीन इमारतीत तरुणाचा खून झाल्याच्या घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी त्याच्या संशयित मित्राला अटक करण्यात आली असून, दारुच्या बाटलीसाठी हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी (दि.02 जून) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

लिओनेल उर्फ पिंकू लोबो (32) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, आलेक्स झेविअर फ्रान्सिस्को कुतिन्हो (34) असे अटक करण्यात आलेल्या संशयित मित्राचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लिओनेल आणि आलेक्स यांच्यात दारुच्या बाटलीवरुन वाद झाला. यात आलेक्सने लिओनेलच्या डोक्यात सिंमेटचा ब्लॉक घालून त्याचा खून केला.

पोलिसांच्या चौकशीत आलेक्सने गुन्हा कबूल केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी आलेक्सला अटक केली असून, याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

मंगळवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला होता. तसेच, स्थानिक आमदार आंतोन वाझ यांनी देखील घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी चौकशीची मागणी केली. कुठ्ठाळीत असा प्रकार घडणे धक्कादायक असल्याचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pradeep Yadav Bail Rejected
Goa Tourist Murder Case
 Peda Banavali Murder Case
Goa Uncle Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com