Flood Situation in Bicholim - मुसळधार पावसाने डिचोलीत पूरसदृश स्थिती

Goa Rain: जोरदार पावसाने डिचोलीत धुमाकूळ घातला. सर्वत्र हाहाकार उडून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. सर्वत्र जलमय स्थिती निर्माण झाली आहे.

Bicholim Rain Update:

डिचोलीत कालपासून जोरदार पर्जनवृष्टी सुरू असून नदी-नाले दुथडी भरून वाहू लागलेत. अनेक ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्या, वाहने वाहून गेली आणि रस्ते, पूलही पाण्याखाली गेले. डिचोलीत पूरनियंत्रणासाठी पाणी बाहेर काढण्यास सुरुवात झाली आहे. डिचोलीसह अस्नोडा येथील पार नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी गाठली आहे. नद्या तुडुंब भरल्याने आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा आणि जलस्रोत खाते सजग झाले आहे. डिचोलीत नदीकाठी तुंबलेले पाणी पंपिंगद्वारे नदीत सोडणे सुरु करण्यात आले आहे. आपत्कालीन यंत्रणेसह जलस्रोत खात्याचे कार्यकारी अभियंते आदी अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com