Mopa Flight Issue: मोपाला येणारे विमान दाबोळीऐवजी बंगळुरूला वळवल्याने प्रवाशांमध्ये नाराजी

Kempegowda Airport Bangalore: मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारे विमान बंगळूर केंपेगौडा विमानतळावर उतरवल्याने तेथे १४० प्रवाशांना मनस्ताप

Goa Flight Issue:

खराब हवामानामुळे मोपा विमानतळावर उतरणारे विमान बंगळूर केंपेगौडा विमानतळावर उतरवल्याने तेथे १४० प्रवाशांना दिवसभर ताटकळत राहावे लागले. रात्री ११ वाजेपर्यंत हे प्रवासी गोव्यात पोचले नव्हते. रात्री २ च्या सुमारास ते मोपा विमानतळाच्या कक्षेत आल्यावर पायलटांना मोपा येथील विमानतळावर पावसाळी हवामानामुळे दृष्यमानता अत्यंत कमी असल्यामुळे विमान बंगळुरूला नेण्याची सूचना करण्यात आली. हवामानाच्या फटक्याने १४० प्रवाशांना मनस्ताप झाला. हे विमान बंगळुरूला हलविल्याने ‘इन्स्ट्रूमेंट लॅण्डिंग सिस्टीम’ चर्चेत आली असली तरी ही यंत्रणा जुलै २०२२ मध्येच मोपा विमानतळावर बसविली आहे, अशी माहिती मिळाली आहे. दाबोळी येथे विमान उतरले असते तर प्रवाशांना कमी त्रास झाला असता. दाबोळी आणि मोपा ही विमानतळे एकाच हवामान पटट्यात असल्याने मोपावर दृश्यमानता कमी असते, तेव्हा दाबोळीवरही तशीच स्थिती असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com