EDC Goa: उद्योगांना चालना देण्यासोबत जलद विकासासाठी 'ईडीसी'ने निभावली महत्त्वपूर्ण भूमिका!

Economic Development Corporation Goa: देशभरात विविध राज्यात 1975 मध्ये आर्थिक विकास महामंडळे स्थापन करण्यात आली. उद्योगांना चालना देण्यासाठी, जलद विकासासाठी आर्थिक विकास महामंडळा(ईडीसी) ने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.

देशभरात विविध राज्यात 1975 मध्ये आर्थिक विकास महामंडळे स्थापन करण्यात आली. उद्योगांना चालना देण्यासाठी, जलद विकासासाठी आर्थिक विकास महामंडळा(ईडीसी) ने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. राज्यात औद्योगिक भरारीसाठी ‘ईडीसी’चे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन ‘ईडीसी’चे एमडी भालचंद्र पै आंगले यांनी केले.

‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ या कार्यक्रमात भालचंद्र पै आंगले बोलत होते. यावेळी ‘ईडीसी’चे संयुक्त एमडी बाळकृष्ण बोरकर यांनीही सहभाग घेतला होता. दरम्यान, पै आंगले म्हणाले की, 1992 मध्ये औद्योगिक परिमाण बदलत असताना जुन्या कंपन्या जाऊन नव्या कंपन्या उदयाला येत होत्या. त्यामुळे याकाळात अनेक आव्हाने आली, परंतु ‘ईडीसी’ने आपले कार्य सुरु ठेवले. 2005 मध्ये सरकारने पाटो विकसित करण्याचे कार्य आम्हाला दिले, त्यामुळे आम्हाला अर्थार्जनाचे अजून एक साधन प्राप्त झाले आणि ‘ईडीसी’ने पुन्हा भरारी घेतली. या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक कार्यालये पणजी पाटोवर आली. जेणेकरुन पणजीतील वाहतूक कोंडी कमी करणे तसेच व्यवसाय पणजीबाहेर आणण्यास मदत झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com