फोंडा: दूधसागर नदीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या विश्रांती परशुराम गावकर (सांतोण-दाभाळ) या महिलेवर दोन मगरींनी हल्ला चढविला. दैव बलवत्तर म्हणूनच ती या जीवघेण्या हल्ल्यातून वाचली. तिचा आरडाओरडा ऐकून तेथे जवळच असलेली तिची भावजय व एक शेजारी प्रकाश नाईक यांनी धाव घेऊन मगरींना दगड मारून हाकलून लावले.
प्रकाश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांतोण येथील दूधसागरच्या नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मगरींचे वास्तव्य असल्याचे आजच्या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आज सकाळी सातच्या सुमारास विश्रांती ही महिला कपडे धुण्यासाठी नदीवर गेली असता अचानक दोन मगरींनी तिच्यावर हल्ला केला.
तिच्या पायाला पकडून ओढत ओढत खोल पाण्यात नेत असता विश्रांती हिने आरडाओरडा केला व झाडाच्या फांदीला घट्ट पकडून राहिली. एका बाजूने दोन्ही मगरी तिला पाण्यात ओढत होत्या. तिची ओरड ऐकून मी आणि माझी वहिनी धावत आलो आणि दगड मारून मगरींना पळविले. तसेच विश्रांती हिला पाण्यातून वर काढले.
रुग्णवाहिकेने विश्रांती हिला प्रथम तिस्क येथील हॉस्पिटलमध्ये नेले. तिच्या दोन्ही पायाला गंभीर जखमा झाल्याने तेथे प्रथमोपचार करून तिला मडगाव सरकारी इस्पितळात पाठवून दिले. अधिक उपचार सुरू आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.