Surla Eco Tourism: 'सुर्ला प्रकल्प ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्यासाठी महत्त्वाचा'; डॉ. देविया राणे

Deviya Rane Surla Eco Tourism: डॉ. राणे म्हणाल्या, सुर्ला येथे होऊ घातलेल्या प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारच्या अभयारण्याला तसेच वन्यप्राण्यांना धोका निर्माण होत नाही.

पणजी: घाटमाथ्यावरील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुर्ला गावात इको टुरिझम प्रकल्पाला काही संघटनांनी हरकत घेतल्याने हा प्रकल्प न्यायप्रविष्ट असल्याने काम थांबलेले आहे, परंतु आम्ही आवश्‍यक त्या सर्व परवानग्या घेतल्या असून न्यायालय आम्हाला न्याय देईल याबाबत खात्री आहे. हा प्रकल्प ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. दिव्या राणे यांनी सांगितले.

डॉ. राणे म्हणाल्या, सुर्ला येथे होऊ घातलेल्या प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारच्या अभयारण्याला तसेच वन्यप्राण्यांना धोका निर्माण होत नाही. हा प्रकल्प जेथे होऊ घातलेला आहे तेथून काही अंतरावर अशाप्रकारच्या कॉटेज आणि इतर बाबी खासगी मालकीच्या आहेत. त्यामुळे काही लोक ज्या जनहिताच्या गोष्टी असतात त्यांना जाणीवपूर्वक विरोध करत हरकत घेतात, परंतु आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्‍वास आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Viswajit Rane Delhi visit
Vishwajit Rane Opposition Statement
Clay Ganesh Idol Environmental Benefits
Goa Surla Farmers Compensation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com