Detla Corp.GST Notice: डेल्टा कॉर्पला 1752 कोटींची जीएसटी नोटीस

Goa Detla Corp.GST Notice: गेमिंग ऑपरेटर ‘डेल्टा कॉर्प’ला गोवा सरकारच्या वाणिज्य कर आयुक्त कार्यालयाकडून सुमारे १७५२ कोटी रुपयांच्या जीएसटी थकबाकीची नोटीस प्राप्त झाली आहे.

पणजी: गेमिंग ऑपरेटर ‘डेल्टा कॉर्प’ला गोवा सरकारच्या वाणिज्य कर आयुक्त कार्यालयाकडून सुमारे १७५२ कोटी रुपयांच्या जीएसटी थकबाकीची नोटीस प्राप्त झाली आहे. कंपनीने भांडवली बाजाराला दिलेल्या निवेदनातून ही माहिती जाहीर केली असून, जीएसटी कमी भरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ही नोटीस जुलै २०१७ ते मार्च २०२२ या कालावधीसाठी असून, यापूर्वी देण्यात आलेल्या तत्सम मागण्यांप्रमाणेच असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. त्या मागण्यांविरोधात कंपनीने न्यायालयात आव्हान दिले असून, सध्‍याची नोटीसही त्याच वादाचा भाग असल्याचे सांगितले आहे.

याआधी २०२३ मध्ये हैदराबाद येथील जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने कंपनीला तब्बल ११,४०० कोटी रुपयांची कर थकबाकीची नोटीस बजावली होती. ही रक्कम कंपनीच्या बाजारमूल्याच्या जवळपास तीनपट असल्याचे नमूद करण्यात आले होते. कंपनी आणि तिच्या उपकंपनीने या मागण्यांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com