VIDEO: सकाळी घराबाहेर पडताच समोर आली मगर! दारातच मगरीला पाहून गावकऱ्यांची उडाली घाबरगुंडी

Talwada Crocodile Rescue Video: काणकोण तालुक्यातील कुंकळ्ळी परिसरातील वेरोडा येथील तळवाडे गावात शनिवारी सकाळी मगरीचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली.

काणकोण तालुक्यातील कुंकळ्ळी परिसरातील वेरोडा येथील तळवाडे गावात शनिवारी सकाळी मगरीचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. एका निवासी घराच्या दरवाजाजवळच सुमारे दीड मीटर लांबीची मगर आढळून आली. घराच्या इतक्या जवळ मगर दिसल्याने परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

घराच्या अगदी जवळ मगर आढळल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या घटनेनंतर नागरिकांनी परिसरातील सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले. मगरीला पकडून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार असल्याची माहिती बचाव स्वयंसेवकाने दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.