Crime News: काणकोणमध्ये 33 हजारांच्या ड्रग्जसह 29 वर्षीय तरुण अटकेत VIDEO

Goa Drug Case: अंमली पदार्थांविरोधात सुरु असलेल्या कारवाईत काणकोण पोलिसांनी मोठी यश मिळवले. चर रस्ता अंडरपासजवळ पहाटेच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून 29 वर्षीय हजरतअली सलूर या तरुणाला अटक केली.

अंमली पदार्थांविरोधात सुरु असलेल्या कारवाईत काणकोण पोलिसांनी मोठी यश मिळवले. चर रस्ता अंडरपासजवळ पहाटेच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून 29 वर्षीय हजरतअली सलूर या तरुणाला अटक केली. हजरतअली हा दावरलीम येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या झडतीमध्ये 3.3 ग्रॅम वजनाचा संशयास्पद एमडीएमए (MDMA) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत सुमारे 33,000 रुपये आहे. तो हा साठा कोणाला तरी पुरवण्यासाठी जात होता, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या काणकोण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Drug Case
Digital Arrest Fraud Case Goa
Ishan Badgujar Culpable Homicide Case
Indore Youth Death in Anjuna Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com