Ponda By Election: फोंड्यात काँग्रेसतर्फे केतन भाटीकर, Watch Video

Ketan Bhatikar: येत्‍या ९ एप्रिलला होणाऱ्या फोंडा पोटनिवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसने केवळ केतन भाटीकर यांचे नाव पक्षश्रेष्‍ठींकडे पाठवले आहे. त्‍यामुळे भाटीकर यांची उमेदवारी निश्‍चित झाली आहे.

येत्‍या ९ एप्रिलला होणाऱ्या फोंडा पोटनिवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसने केवळ केतन भाटीकर यांचे नाव पक्षश्रेष्‍ठींकडे पाठवले आहे. त्‍यामुळे भाटीकर यांची उमेदवारी निश्‍चित झाली आहे.

दुसरीकडे भाजपने रितेश नाईक आणि माजी नगराध्‍यक्ष विश्‍‍वनाथ दळवी यांची नावे पाठवली आहेत. त्‍यावर दोन दिवसांत निर्णय होणार आहे. त्‍यामुळे ही निवडणूक रंगण्‍याची शक्‍यता आहे. मंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक यांचे निधन झाल्‍यानंतर तेथील जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी येत्‍या ९ एप्रिलला निवडणूक घेण्‍याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने काल रविवारी जाहीर केले. त्‍यामुळे प्रदेश काँग्रेसने तत्‍काळ सोमवारी प्रदेश कार्यकारिणीची बैठक घेत, काहीच दिवसांपूर्वी मगोला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्‍ये आलेले केतन भाटीकर यांच्‍या नावावर शिक्‍कामोर्तब करताना त्‍यांचे नाव पक्षश्रेष्‍ठींकडे पाठवले. त्‍यामुळे भाटीकर यांची उमेदवारी पक्‍की झाली आहे.

भाजपने रवी नाईक यांचे ज्‍येष्‍ठ सुपूत्र रितेश नाईक यांच्‍यासह विश्‍‍वनाथ दळवी यांचे नाव केंद्रीय समितीकडे पाठवले आहे. त्‍यासंदर्भात मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक मंगळवारी किंवा बुधवारी दिल्लीला जाणार आहेत. ते गोव्‍यात परतल्‍यानंतर भाजपकडून अधिकृत उमेदवाराच्‍या नावाची घोषणा होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com