ट्रॉलर्स मालकांचे आंदोलन! बंदी असताना नियमांचे उल्लंघन; पारंपरिक मच्छीमारांवर बेकायदेशीर मासेमारीचा आरोप

Colva Trawler Owners Protest: मासेमारी बंदीचा कालावधी सुरू असतानाही, पारंपरिक मच्छीमार बेकायदेशीरपणे मासेमारी करत असल्याचा आरोप करत ट्रॉलर्स मालकांनी जोरदार निदर्शने केली

कोलवा: सध्या मासेमारी बंदीचा कालावधी सुरू असतानाही, पारंपरिक मच्छीमार बेकायदेशीरपणे मासेमारी करत असल्याचा आरोप करत ट्रॉलर्स मालकांनी कोलवा येथे एकत्र येत जोरदार निदर्शने केली. ट्रॉलर्स मालकांनी आरोप केला आहे की, पारंपरिक मच्छीमारांना ९ एचपी (HP) मोटर असलेल्या लहान बोटींनी समुद्रात जाण्याची परवानगी असली तरी, ते दोन किंवा अधिक मोठ्या मोटर्स वापरत आहेत, जे नियमानुसार पूर्णपणे चुकीचे आहे. यासोबतच, ते विंच आणि मोनोफिलामेंट जाळ्यांचा वापर करत आहेत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर मासेमारी होऊन पर्यावरणाचेही नुकसान होत आहे.

ट्रॉलर्स मालकांच्या मते, हे उच्च न्यायालयाच्या आदेशांचे सरळसरळ उल्लंघन आहे. "आम्ही यासंदर्भात मत्स्यव्यवसाय विभागाला कळवले आहे, नियंत्रण कक्षालाही माहिती दिली आहे, पण अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. आम्ही हे तात्काळ थांबवण्याची मागणी करतो," असे संतप्त ट्रॉलर्स मालकांनी सांगितले.या आरोपांवर मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "आम्ही पारंपरिक मच्छीमारांच्या बोटी समुद्रात जाताना पाहिल्या आहेत, मात्र ते कोणत्या मोटर्सचा वापर करत आहेत, हे आम्हाला माहीत नाही. आम्ही आमच्या वरिष्ठांना याबाबत कळवले आहे. बोट किनाऱ्यावर आल्यावर आम्ही त्यांची तपासणी करू," असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com