VIDEO: निरीक्षक नाईक पुन्हा कोलव्यात, ग्रामस्थ संतप्त; आमदार व्हिएगस यांनी पोलिस अधीक्षकांना विचारला जाब

PI Vikram Naik return protest Colva: हल्लीच कोलवा येथील चर्च प्रकरणी पोलिस निरीक्षक नाईक यांच्यावर कारवाई करून त्यांना दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयातील राखीव दलात बदली करण्यात आले होते.

मडगाव: कोलवा पोलिस ठाण्यात पुन्हा पोलिस निरीक्षकपदी विक्रम नाईक यांना नियुक्त केल्याने संतप्त ग्रामस्थांनी बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक संतोष देसाई यांना भेटून यासंबंधी जबाब मागितला.

सध्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची प्रकृती ठीक नसल्याने ते बरे होऊन गोव्यात आल्यानंतर आपण त्यांच्याकडेही याबाबत बोलणार असल्याचे व्हिएगस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

हल्लीच कोलवा येथील चर्च प्रकरणी पोलिस निरीक्षक नाईक यांच्यावर कारवाई करून त्यांना दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयातील राखीव दलात बदली करण्यात आले होते. गुरुवारी नाईक यांना पुन्हा कोलवा पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले असून त्यांनी पदाचा ताबा घेतला. त्यांना पुन्हा पूर्वीच्या जागी पाठवण्यात आल्याने लोक संतप्त झाले आहेत.

असा अधिकारी नकोच

नाईक यांच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर आरोप असून एका महिला उपनिरीक्षकानेही त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. नाईक यांच्याबाबत विधानसभा अधिवेशनातही कुकर्माचा पाढा वाचला गेला होता.

असा अधिकारी आम्हाला या भागात नको, असे आमदार व्हिएगस यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, या प्रकरणाचा अखेरपर्यंत पाठपुरावा केला जाईल, असेही आमदार वेन्झी व्हिएगस यांनी यावेळी जाहिर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com