CJI. D. Y. Chandrachud: गोवा हे जगाचे आर्थिक केंद्र बनू शकते: डी.वाय. चंद्रचूड

Goa News: आर्बीट्रेशन केंद्रासारख्या माध्यमातून जागतिक स्तरावरील आर्थिक केंद्र बनण्याची गोव्याकडे क्षमता असल्याचे सरन्यायाधीशांनी नमूद केले.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉ. डी.वाय. चंद्रचूड आज (19 ऑक्टोबर) गोव्याच्या दौऱ्यावर होते. सरन्यायाधीशांनी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत मेरशी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या संकुलाचे उद्धाटन केले. त्यानंतर त्यांनी राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशन सोहळ्याला हजेरी लावली. आपल्या भाषणादरम्यान, सरन्यायाधीशांनी गोवा हे जगाचे आर्थिक केंद्र बनू शकते यावर प्रकाश टाकला. आर्बीट्रेशन केंद्रासारख्या माध्यमातून जागतिक स्तरावरील आर्थिक केंद्र बनण्याची गोव्याकडे क्षमता असल्याचे सरन्यायाधीशांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

BRICS India Trade Deficit
Goa Gruha Aadhaar Scheme Amount Increase
Supreme Court Aravali Hills Panel Time Extension Rejected
India Sugar Import 10 Lakh Tonnes
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com