Cash For Job Scam: 'मुख्यमंत्र्यांनी नोकरीत घोटाळा करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी', नरेश सावळ यांचे आवाहन

goa politics: राज्यात सध्या कॅश फॉर जॉब प्रकरणावरुन रान उठलं आहे. विरोधक या प्रकरणावरुन सावंत सरकारला घेरत आहेत.

राज्यात सध्या कॅश फॉर जॉब प्रकरणावरुन रान उठलं आहे. विरोधक या प्रकरणावरुन सावंत सरकारला घेरत आहेत. सावंत सरकारमधील मंत्र्यांसह आमदरांचाही या प्रकरणात हात असल्याची घणाघाती टीका विरोधकांकडून होत आहे. यातच, डिचोलीचे माजी आमदार नरेश सावळ यांनी मुख्यमंत्र्यांनी दोषींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याचे आवाहन केले. सावळ म्हणाले की, 2012 पर्यंत मोठ्याप्रमाणात नोकऱ्या दिल्या गेल्या पण अशाप्रकारे पैसे कुणाकडूनच घेतले गेले नाही. प्रतापसिंह राणे, विश्वजित राणे, दिगंबर कामत, सुदिन ढवळीकर यांनी कधीच नोकरी देण्यासाठी पैसे घेतले नाही. परंतु आताची परिस्तिथी बघितली तर भविष्यकाळ डेंजर झोनमध्ये आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या तळाशी जाऊन मुख्य दोषींना शोधून काढणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

WhatsApp Friend online Fraud case
Goa Job Scam
 Goa Facebook Part Time Job Scam
WhatsApp Part Time Job Scam Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com