डिचोली तालुक्यातील बोर्डे परिसरातील रहिवाशांना भेडसावणारी पाणीटंचाई अखेर संपुष्टात आली. येथील मुख्य पाइपलाइनचा व्हॉल्व्ह खराब झाल्यामुळे पाणीपुरवठ्यात अडथळे निर्माण होत होते. सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने दखल घेत जुना व्हॉल्व्ह बदलून नवीन व्हॉल्व्ह बसवला. या दुरुस्तीनंतर परिसरातील पाणीपुरवठा आता सुरळीत झाला असून रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. ऐन उन्हाळ्यात पाणी आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून, विभागाने केलेल्या त्वरित कारवाईचे कौतुक केले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.