Bihar Boat Tragedy: जेवणाचे आमंत्रण ठरले जीवघेणे! बिहारमध्ये नाव उलटून लहान मुलांसह 13 जणांनी गमावला जीव VIDEO

Bihar Boat Tragedy News: बिहारमधील वैशाली जिल्ह्यात गंगा नदीत एक मोठी दुर्घटना घडली. राघोपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक लहान नाव नदीच्या पात्रात उलटली.

बिहारमधील वैशाली जिल्ह्यात गंगा नदीत एक मोठी दुर्घटना घडली. राघोपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक लहान नाव नदीत उलटली. या भीषण अपघातात तब्बल 13 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. नावेमधील बहुतेक प्रवासी लहान मुले आणि तरुण होते. हे सर्वजण एका कार्यक्रमासाठी जेवणाचे आमंत्रण असल्याने जात होते. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरु केले. काही लोकांना सुखरुप बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या 7 जणांवर उपचार सुरु असून तीन ते चार जण अजूनही बेपत्ता आहेत. पोलिस आणि एसडीआरएफचे पथक स्थानिक पाणबुड्यांच्या मदतीने शोधमोहीम राबवत आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com