Mayem: ‘साळगावकर’च्या खाणी बंद ठेवा! मये-वायंगिणी ग्रामसभा तापली; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन Video

Bicholim Mayem Mining: खाणीच्या मुद्यावरून मये-वायंगिणी पंचायतीची ग्रामसभा प्रचंड वादळी ठरली. पैरा येथील ‘साळगावकर’ कंपनीच्या खाणींविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली.

डिचोली : खाणीच्या मुद्यावरून मये-वायंगिणी पंचायतीची ग्रामसभा प्रचंड वादळी ठरली. पैरा येथील ‘साळगावकर’ कंपनीच्या खाणींविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. तसेच प्रलंबित मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत खनिज वाहतूक व खाणीवरील सर्व कामकाज बंद ठेवावे, अशी मागणी केली.

ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत उद्या सोमवारपर्यंत संबंधित खाण कंपनीस नोटीस बजावून प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळविण्याचे आश्वासन पंचायतीने दिले. ग्रामसभेत व्यक्त झालेली तीव्र नाराजी आणि पंचायतीची भूमिका पाहता ‘साळगावकर’ कंपनीसमोर आंदोलनाचे संकट उभे ठाकले आहे. सोमवारी दुपारनंतर स्थानिक खाणींविरोधात रस्त्यावर उतरण्याचे स्पष्ट संकेत ग्रामस्थांकडून देण्यात आले आहेत. पैरा गावात आंदोलनासाठी जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com