Bhutani Project Against Protest: भूतानी प्रकल्पाविरोधात सांकवाळवासीयांचा आंदोलनाचा इशारा
भूतानी प्रकल्पावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. भूतानी प्रकल्पाना देण्यात आलेला परवाना रद्द करण्याची मागणी काही दिवसांपासून सांकवाळवासीय करतायेत. मात्र सरकार त्यांच्या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष करत असल्याने सांकवाळचे माजी सरपंच प्रेमानंद नाईक यांनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला. यातच आता, 27 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा सांकवाळवासीयांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. तर दुसरीकडे, राज्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनीही या प्रकरणावरुन सावंत सरकारला निशाण्यावर घेतले. सरकारला लोकांच्या जीवाची काळजी नसल्याची टीका आलेमाव यांनी केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.