Baga Crime: गोव्यात पर्यटकांचा धुडगूस! स्थानिकांना मारहाण; संतप्त जमावाचा पोलिसांना घेराव

Baga Beach Fight News: बागा येथे एका क्लबच्या बाहेर टाऊट्स, पर्यटक व बाऊन्सर्समध्ये झालेल्या वादात, काहींनी संशयावरून अकारण दोघा स्थानिकांना मारहाण करण्याची घटना घडली. यात आकाश व अमन नामक दोघा बंधूंच्या डोक्यावर दंडुक्यांनी वार करण्यात आले.

Baga Beach Tourist Local Fight Club Sealed By Calangute Police

कळंगुट: बागा येथे एका क्लबच्या बाहेर टाऊट्स, पर्यटक व बाऊन्सर्समध्ये झालेल्या वादात, काहींनी संशयावरून अकारण दोघा स्थानिकांना मारहाण करण्याची घटना घडली. यात आकाश व अमन नामक दोघा बंधूंच्या डोक्यावर दंडुक्यांनी वार करण्यात आले. यातील एकाला १२ तर दुसऱ्याला आठ टाके पडले.

याप्रकरणी स्थानिकांनी कळंगुट पोलिस स्थानकावर धडक देत पोलिसांना जाब विचारला. स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असे म्हणत, जमावाने पोलिस स्थानकात ठिय्या मांडला. या प्रकरणात गुंतलेल्यांच्या अटकेची मागणी त्यांनी केली. पोलिसांनी याप्रकरणी पाचजणांना अटक झाली होती. मात्र, मारहाण करणारे पंधरा ते वीसजण होते. त्यामुळे सर्वांना अटक करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पीडित कुटुंबीयांनी लावून धरली.

पोलिस स्थानकावर लोकांची गर्दी वाढल्याने रात्री उशिरा स्थानिक आमदार मायकल लोबो घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करून पोलिसांना महत्त्वाच्या सूचना केल्या व एकंदरीत घटनांबाबत चिंता व्यक्त केली. या मारहाण प्रकरणात पोलिसांनी मोहन सिंग (२८, राजस्थान), लबाजित बसुमाता (३४, पश्चिम बंगाल), रवींद्र सिंग (४२, उत्तराखंड) या तिघा क्लबच्या कर्मचाऱ्यांना अटक केली. बागा येथे ज्या क्लबबाहेर दोघा स्थानिकांना मारहाण झाली होती, तो ‘डाउनटाऊन’ क्लब सोमवारी रात्री उशिरा पोलिसांच्या उपस्थित सील करण्यात आला. परिणामी, युवकांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. घटना घडली तेव्हा, क्लबच्या मालकाने बंदुकीचा धाकदेखील दाखवल्याचा दावा पीडितांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com