National Film Award: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, 'आर्टिकल 370' सर्वोत्कृष्ट चित्रपट

Article 370 Best Feature Film: प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली असून, २०२४ या वर्षासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार गोव्याचे चित्रपट निर्माते आदित्य सुहास जांभळे यांच्या ‘आर्टिकल ३७०’ने पटकावला आहे.

नवी दिल्ली: प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली असून, २०२४ या वर्षासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार गोव्याचे चित्रपट निर्माते आदित्य सुहास जांभळे यांच्या ‘आर्टिकल ३७०’ने पटकावला आहे. याच चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेत्री यामी गौतमला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’च्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवणारा अभिनेता रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या पहिल्याच चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार पटकावून दिग्दर्शक म्हणून यशस्वी पदार्पण केले आहे. ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा पुरस्कार दोन वेगवेगळ्या कलाकारांना विभागून देण्यात आला आहे. ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटासाठी कार्तिक आर्यन सर्वोत्तम अभिनेते म्हणून घोषित केले.

पुरस्कारांवर मराठीचेही वर्चस्व

‘मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान मिळाला. ‘घरत गणपती’मधील ‘नवसाची गौरी माझी’ या गाण्यासाठी अभय जोधपूरकरने सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार पटकावला. लघुपट विभागातील मुख्य पुरस्कार ‘भंगार’ला मिळाला. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’साठी योगेश देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com