Anmod Ghat Road Collapsed: अनमोड घाटात रस्त्याचा भाग कोसळला

Anmod Ghat: गोवा–बेळगावला जोडणाऱ्या रस्त्यावरील अनमोड घाटात रस्ता खचला आहे. घाटातील या रस्त्याला यापूर्वीच भेगा पडल्या होत्या, अखेर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास रस्ता खचला.

गोवा – बेळगावला जोडणाऱ्या रस्त्यावरील अनमोड घाटात रस्ता खचला आहे. घाटातील या रस्त्याला यापूर्वीच भेगा पडल्या होत्या, अखेर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास रस्ता खचला. यामुळे गोवा – बेळगाव मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

अनमोड घाटातील दूधसागर मंदिराच्या जवळील रस्त्याला भेगा पडल्या होत्या, प्रशासनाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर या भागात बॅरिकेड्स टाकून गोव्याच्या दिशेने येणारी वाहतूक एकेरी ठेवण्यात आली होती. अखेर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा रस्ता खचला. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com