अॅक्शन सुपरस्टार विन डिझेल (Vin Diesel) ने त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे की, ड्वेन जॉन्सन (Dwayn Johnson) ला फास्ट अँड फ्युरियस (Fast and Furious) फ्रँचायझीच्या 10व्या भागामध्ये एजंट लुकास हॉब्स (Lucas Hobbs) ची भूमिका पुन्हा साकारण्यास विनंती केली आहे.
2016 मध्ये 'द फास्ट अँड फ्युरियस' दरम्यान विन डिझेल आणि ड्वेन जॉन्सन (Vin Diesel and Dwayn Johnson) मध्ये भांडण झाले होते. तेव्हापासून या दोन अॅक्शन स्टार्समध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. खरं तर, फ्रँचायझीच्या शूटिंगच्या शेवटच्या आठवड्यात, द रॉकने सोशल मीडियावर पोस्ट करून डिझेलच्या व्यावसायिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता डिझेलने रविवारी जॉन्सनला त्याच्या इंस्टाग्रामवर आगामी फ्रँचायझीमध्ये काम करण्याची विनंती केली आहे.
डिझेलने त्याच्या इंस्टाग्राम पोस्ट मध्ये लिहिले की, “माझा छोटा भाऊ ड्वेन… वेळ आली आहे. जग फास्ट अँड फ्युरियसच्या अंतिम फेरीची वाट पाहत आहे. माझ्या घरातली मुलं तुम्हाला अंकल ड्वेन म्हणतात. अशी कोणतेही सुट्टी नाही की मुलांनी तुम्हाला शुभेच्छा पाठवल्या नाहीत. वेळ आली आहे, वारसा आपली वाट पाहत आहे. मी तुम्हाला वर्षांपूर्वी सांगितले होते की मी पाब्लोला दिलेले वचन मी पाळीन. डिझेल प्रेमाने त्याचा दिवंगत मित्र आणि सह-अभिनेता पॉल वॉकरला पोब्लो म्हणतो.
डिझेल पुढे म्हणाला, मी वचन दिले होते की 'फास्ट अँड फ्युरीज 10' चा फिनाले सर्वोत्कृष्ट असेल. मी तुला खूप प्रेमाने मनवतोय. तुम्ही फ्रेंचायझी सोडू शकत नाही. तुमचे फ्रेंचायझी मध्ये खूप महत्त्व आहे. हॉब्सचे पात्र तुमच्यापेक्षा चांगले कोणी करू शकत नाही. मला आशा आहे की तुम्ही माझा मुद्दा समजून घ्याल आणि या भागामध्ये काम कराल."
जॉन्सन हा हॉलिवूडच्या अॅक्शन स्टार्सपैकी एक आहे, जो 2011 मध्ये 'फास्ट अँड फ्यूरियस' च्या पाचव्या भागात डिप्लोमेट स्किओटी सर्व्हिस एजंट लुकास हॉब्स म्हणून दिसला होता. यानंतर, जॉन्सनने फास्ट अँड फ्युरियसच्या इतर तीन भागांमध्ये काम केले नाही. 'फास्ट अँड फ्युरियस 7 एप्रिल 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. डिझेल मुख्य भूमिकेत असणार आहे. याशिवाय टायरेस गिब्सन, सुह कांग, ख्रिस लुडाक्रिस, ब्रिज जॉर्डाना आणि मिशेल रॉड्रिग्ज यांचेही पुनरागमन अपेक्षित आहे. जस्टिन लिन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.