कोण आहे 'गोवन रॅपर मामा’

साईश सावर्डेकरला लोक ‘गोवन रॅपर मामा’ म्हणून ओळखतात.
एंटिटी
एंटिटीDainik Gomantak
Published on
Updated on

साईश सावर्डेकर याला लोक ‘गोवन रॅपर मामा’ म्हणून ओळखतात. आपल्या भावना तो ‘रॅप’ या माध्यमातूनच व्यक्त करतो. त्याच्या ‘एंटिटी’ ह्या नवीन रॅप गीताचा व्हिडिओ (Video) त्याच्याच ‘गोवन रॅपर मामा’ या यूट्यूब चॅनलवरून (You Tube) 15 जानेवारी रोजी प्रकाशित होणार आहे.

‘गोवन रॅपर मामा’ म्हणजे, (Goan Rapper Mama) साईश सावर्डेकर. त्याच्या पहिल्याच, ‘तू म्हण्टाले..’ या रॅप गीताला लोकांनी खूप पसंत केले. त्यानंतर ‘बेबदो’. ‘मेक गोवा ग्रेट अगेन’, ‘फुडार’ आदी गीतांमधून (Song) त्याचा रॅप प्रवास चालू राहिला. आता येणारे, त्यानेच लिहिलेले ‘एंटिटी’ हे रॅप गीत, कविता आणि ताल याचा एक मिलाफ आहे.

एंटिटी
Wedding Date Set! मौनी-सुरज 27 जानेवारीला बंगाली पद्धतीने करणार बीच वेडिंग

या गीतात, आपल्या आयुष्याचे वर्णन करताना, ते बाह्य स्वरूपात दिसते कसे आणि अंतरात असते कसे याविषयी तो सांगतो. या गीतातून साईश आपल्या जीवनाच्या भूतकालीन पायऱ्यावरचे सारे तुकडे मांडतो. कशाप्रकारे व्यसनाच्या अधीन झालेल्या आपल्या जीवनाचे स्वरूप खरे मानून आपण त्याला खोल काळोखात मांडून ठेवले होते आणि कसा त्यातच रमून गेलो होतो हे रॅपमधून (Rap) हे सांगताना, सिद्धेश या गोष्टी टाळाव्यात हेच सांगू पाहतो. या व्हिडिओमधून त्याचे एकाकीपण आणि त्यातून व्यक्त होणारी वेदना मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

‘एंटिटी’चे दिग्दर्शन सिद्धांत खांडेकर यांनी केले आहे. वेदांत सावंत यांनी या व्हिडीओचे (Video) चित्रीकरण केले आहे आणि संकलन केले आहे संकेत खांडेकर यांनी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com