
झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस (Devmanus) ही मालिका सध्या खूप गाजत आहे. देवमाणूस या मालिकेतील सर्वांच्या भूमिका अतिशय उत्तम झालेल्या आहेत. देवमाणूस या मालिकेतील एसीपी दिव्या सिंह ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. नेहा खान ने दिव्या सिंहची भूमिका साकारली आहे. मात्र नेहा खान या मालिकेतुन बाहेर पडणार आहे अशी देखील चर्चा सुरु आहे. याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
नेहा खान (Neha Khan) आता मराठी बिग बॉस 3 (Bigg Boss 3) मध्ये दिसणार असल्याची चर्चा देखील दिवसांपासून सुरु आहे. यामुळे नेहा ही मालिका सोडत असल्याचे सांगण्यात येत आहे. दिव्या सिंहच्या जागी इन्स्पेक्टर शिंदे नामक ही व्यक्ती मालिका मध्ये येणार आहे. या प्रकरणात अजित कुमार देवने उलटतपासणी घेतली आहे आणि देव आता बजवात असल्याचे दिसत आहे. देवमाणूस ही मालिका रंजन टप्प्यावर येऊन थांबलेली आहे. (Where is the real Ajit Kumar Dev in Marathi serial Devmanus)
अजित कुमार देव हा उलट तपासणी दरम्यान परत तुरुंगातून सुटणार का? त्याला फाशी देणार का हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये कळणारच आहे. सरकारी वकील आर्या या न्यायाधीशांकडे विनंती करतात की, मला साक्षीदारांचा जबाब नोंद करण्यासाठी परवानगी द्या. न्यायाधीश अजित कुमार देवला परवानगी देतात.आता मुंबईतून डॉक्टर को लते यांची एंट्री देखील या मालिकेत होणार आहे.
कोलते डॉक्टर आता काय साक्ष देतील याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष आहे. कोलते डॉक्टरच्या साक्षी वरच अजित कुमारचे भवितव्य ठरणार आहे असे असले तरी देव हा वाड्यातील लोकांसाठी देव माणूसच असणार आहे. अजित कुमार आणि डिंपलचे कारस्थान अजून सुरूच आहे.
किरण गायकवाड या अभिनेत्याने अजित कुमार देवची भूमिका साकारली आहे. या आधी देखील किरण गायकवाड याने लागीर झालं जी या मालिकेत विलेनची भूमिका साकारली होती. त्याचे हे पात्र प्रेक्षकांना खूप आवडले होते. आज आम्ही तुम्हाला या मालिकेत अजित कुमार देव ही भूमिका कोणाच्या जीवनावर आधारित आहे, हे सांगणार आहोत. तुम्हाला माहित आहे का ही मालिका एका सत्य घटनेवर आधारित आहे.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये एका शहरात संतोष पोळ या माणसाने बोगस प्रमाणपत्राच्या आधारे एक दवाखाना टाकला होता. संतोष पोळ या शहरात राहून अनेक लोकांवर उपचार करायचा. त्याच्या दवाखान्यात जे कोणी येयचं त्यांना तो सांगायचा तुम्हाला खूप मोठी बिमारी झाली आहे. ज्या लोकांनी त्याची पोल खोलण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तींची त्याने हत्या केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.