Gomantak Explained : चित्रपट टॅक्स फ्री होतो म्हणजे नेमकं काय? टॅक्स फ्रीचा फायदा कुणाला?

विवेक रंजन अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला.
Theatre, meaning of a tax free movie
Theatre, meaning of a tax free movieDainik Gomantak
Published on
Updated on

'द काश्मीर फाइल्स' चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. याचबरोबर चित्रपटाला राजकीय पाठिंबा मिळत असल्याने, हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड यासह अनेक राज्यांनी चित्रपट करमुक्त घोषित केला आहे. चित्रपट करमुक्त करणे म्हणजे तिकिटाचा दर कमी करणे. विवेक रंजन अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला. (Meaning of a tax free movie)

Theatre, meaning of a tax free movie
'RRR' चित्रपटाच्या टीमने 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला दिली भेट

कोणत्या निकषांच्या आधारे चित्रपट करमुक्त घोषित केला जातो?
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' चित्रपटाच्या निर्मात्या सविता राज हिरेमठ यांनी अलीकडेच सोशल मीडियावर (Social Media) त्यांचा चित्रपट करमुक्त घोषित न केल्याने नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “माझ्या चित्रपटाला जबरदस्त प्रशंसा मिळाली आहे. मात्र तो करमुक्त केला जात नाही आहे.”

चित्रपट करमुक्त करून घेण्यासाठी कोणतेही निश्चित निकष नाहीत. कर महसुलावरील आपला दावा सोडून देण्याचा निर्णय राज्य सरकारचा असतो. सामाजिक आणि प्रेरणादायी विषयाशी संबंधित चित्रपट करमुक्त केले जातात. परिणामी चित्रपटच्या तिकिटाचे दर कमी होतात. यामुळे लोक थिएटरमध्ये जाऊन चित्रपटाचा आनंद लुटतात.

Theatre, meaning of a tax free movie
USA मध्ये टॉप 10 मध्ये झळकला 'द काश्मीर फाईल्स'

इतर चित्रपटांच्या तुलनेत करमुक्त चित्रपट पाहणे किती स्वस्त आहे?
2017 मध्ये वस्तू आणि सेवा कर (GST) लागू झाला. याआधी राज्य सरकार करमणूक कर आकारायचे. हा कर राज्यानुसार बादलायचा. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये हा जास्त होता. करमणूक कर माफ केल्याने तिकिटे लक्षणीयरीत्या स्वस्त होत होती.

जीएसटीच्या (GST) सुरुवातीच्या काळात, चित्रपटाच्या (Movie) तिकिटांवर 28 टक्के जीएसटी आकारला जात होता. त्यानंतर, दोन स्लॅब आणले गेले - 100 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या तिकिटांवर 12 टक्के जीएसटी आणि महाग तिकिटांवर 18 टक्के. हा कर केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाटून घेतला जातो. जेव्हा एखादे राज्य चित्रपट करमुक्त घोषित करतो, तेव्हा फक्त SGST घटक माफ केला जातो, मात्र CGST आकारला जातो. यामुळे तिकिटे काही प्रमाणातच स्वस्त होतात. चित्रपट निर्माते करमुक्त टॅगकडे सरकारचे समर्थन म्हणून पाहतात. यामुळे चित्रपटाची चर्चा होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'काश्मीर फाइल्स' करमुक्त करण्याची भाजपच्या खासदारांची मागणी फेटाळून लावली.

देशात इतर कोणते चित्रपट करमुक्त करण्यात आले आहेत?
2016 मध्ये, दंगल आणि नीरजा या दोन सामाजिकदृष्ट्या संबंधित चित्रपटांना अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आले होते. अलिकडच्या वर्षांत अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आलेल्या इतर चित्रपटांमध्ये टॉयलेट: एक प्रेम कथा (2017), छपाक (2020), मेरी कोम (2014), तारे जमीन पर (2007), मर्दानी (2014), आणि निल बट्टे सन्नाटा (2015) यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com