New Year: रणवीर सिंहने शेअर केला विचित्र व्हिडिओ, चाहते म्हणाले...

रणवीर सिंहचे दोन चित्रपट फॉप झाले आहे.
News Year Ranveer Singh | Ranveer Singh Video Viral
News Year Ranveer Singh | Ranveer Singh Video Viral Dainik Gomantak

News Year Ranveer Singh Video : बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंहच्या नववर्षात चाहत्यांना आश्चर्य करणारी पोस्ट शेअर केली आहे. 2023 च्या आगमनानंतर अभिनेत्याने 1994 मध्ये रिलीज झालेल्या टॉम हँक्सच्या 'फॉरेस्ट गंप' चित्रपटातील एक क्लिप त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केली. क्लिपमध्ये एकीकडे नववर्षाचे सेलिब्रेशन सुरू आहे तर दुसरीकडे लेफ्टनंट डेन गंभीर विचारात बसलेले आहेत.

हा व्हिडिओ शेअर करत रणवीरने लिहिले, 'लेफ्टनंट डेन मी तुला अनुभवू शकतो.' ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. खरं तर 2022 हे वर्ष रणवीरसाठी वाईट गेले. त्याचे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) काही खास कमाई करू शकले नाहीत. 'जयेशभाई जोरदार' बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. दुसरीकडे रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सर्कस'चीही अशीच परिस्थिती आहे.

लोक रणवीर सिंहची ही पोस्ट त्याच्या चित्रपटांच्या फ्लॉपशी जोडून पाहत आहेत. एका यूजरने व्हिडिओच्या (Video) खाली कमेंट केली की, 'सर्कस चित्रपटामुळे भाऊला मोठा धक्का बसला आहे.' आणखी एका युजरने 'कमबॅक विल बी ग्रेट किंग, आमचा तुझ्यावर विश्वास आहे, नवीन वर्षाच्या शुभेच्छा' अशी कमेंट केली. यापूर्वी त्यांचा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट '83' नेही बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नव्हती.

करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' मध्ये रणवीरकडे अजूनही एक मोठा चित्रपट आहे, ज्यामध्ये धर्मेंद्र, जया बच्चन, आलिया भट्ट आणि शबाना आझमी देखील आहेत. हा चित्रपट 28 एप्रिलला रिलीज होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com