विक्रांत मेस्सीला वाढदिवसाची भेट म्हणून मिळाले गुलजार यांचे शूज

अभिनेत्याने फोटो शेअर केला आणि लिहिले - किती चांगले भाग्य आहे.
Vikrant Massey Birthday Gift
Vikrant Massey Birthday Gift Dainik Gomantak
Published on
Updated on

Vikrant Massey Birthday Gift: बॉलिवूडचा प्रतिभावान अभिनेता विक्रांत मेस्सी याचा आज वाढदिवस आहे. आज विक्रांतच्या वाढदिवसानिमित्त सेलेब्सपासून ते चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. दुसरीकडे, मेघना गुलजारने विक्रांतला अशी भेट दिली आहे, ज्याची कल्पनाही त्याने केली नसेल. मेघनाने खरं तर विक्रांतला शूज भेट म्हणून दिले आहेत. पण हे शूज सामान्य नाहीत.

हे शूज त्यांचे वडील आणि ज्येष्ठ कवी, लेखक, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक गुलजार यांचे शूज आहेत. हे गिफ्ट मिळाल्याने विक्रांतला खूप आनंद झाला आहे. या भेटीचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Vikrant Massey Birthday Gift
Hrithik Roshan: ह्रतिकने 'विक्रम वेधा' मधील शेअर केला लूक

विक्रांतने (Vikrant Massey) यापूर्वी मेघनाने त्याच्यासाठी लिहिलेल्या पत्राचा फोटो शेअर केला आहे. यानंतर त्याने बुटाचा फोटो शेअर केला आहे. मेघनाने पत्रात लिहिले आहे की, 'प्रिय विक्रांत, हे खूप आधीचे कर्ज होते, पण आज मी ते पूर्ण केले याचा मला आनंद आहे. तुला वाढदिवसाच्या आणि पुढील वर्षासाठी खूप शुभेच्छा.

विक्रांतने पुन्हा बुटाचा फोटो शेअर करत लिहिले, 'काय नशीब गुलजार (Gulzar) साहेबांनी घातलेला बूट मिळाला.'

Vikrant Massey Birthday Gift
Vikrant Massey Birthday Gift Dainik Gomantak

तसे, हा वाढदिवस (Birthday) विक्रांतसाठी खास आहे कारण लग्नानंतरचा हा त्याचा पहिला वाढदिवस आहे. विक्रांतने फेब्रुवारीमध्ये त्याची दीर्घकाळाची मैत्रीण शीतल ठाकूरसोबत लग्न केले. दोघांच्या लग्नात फक्त कुटुंब आणि मित्र सहभागी झाले होते. दोघांचे लग्न अगदी साधेपणाने पार पडले. मात्र, दोघांनी जेव्हा लग्नाचे फोटो शेअर केले तेव्हा ते सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com