सैफ अली खान आणि हृतिक रोशन स्टारर विक्रम वेधा पहिल्या वीकेंडमध्ये 40 कोटींची कमाई करू शकला नाही. या चित्रपटाला प्रेक्षकांचे अपेक्षेप्रमाणे प्रेम मिळत नाही. या चित्रपटाने पहिल्या दिवशी एकूण 10 कोटींची कमाई केली होती, तर ट्रेड विश्लेषकांच्या मते चित्रपटाला 15 ते 20 कोटींची ओपनिंग मिळू शकते.
या चित्रपटाने पहिल्या दिवशी एकूण 10. 58 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत थोडीशी वाढ झाली आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 12.51 कोटींची कमाई केली. या चित्रपटाला (Vikram Vedha) प्रेक्षकांच्या वतीने मिळणारा सकारात्मक परिणाम आणि समीक्षकांकडून मिळालेली प्रशंसा याचा फायदा या चित्रपटाला होताना दिसला आहे. तिसर्या दिवशीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) जवळपास 15 कोटींची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिस इंडियानुसार, रविवारी चित्रपटाने (Movie) 14 ते 15 च्या दरम्यान कमाई केली आहे. त्यानुसार चित्रपटाची पहिल्या वीकेंडची कमाई 38 कोटींच्या आसपास आहे.
विक्रम वेधा (Vikram Vedha) पुष्कर-गायत्री यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपट निर्मात्या जोडीच्या त्याच नावाच्या 2017 च्या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. यामध्ये राधिका आपटे, योगिता बिहानी, रोहित सराफ, शरीब हाश्मी आणि इतर कलाकार आहेत. मूळ चित्रपटात आर माधवन हा पोलिस आणि विजय सेतुपती गुंडाच्या भूमिकेत होता.
विक्रम वेदाची कथा 'विक्रम आणि बेताल' या भारतीय लोककथेवर आधारित आहे. त्याची कथा ट्विस्ट आणि टर्नने भरलेली आहे. हा चित्रपट एक कठोर पोलीस अधिकारी विक्रम (सैफ अली खान) आणि एक भयानक गुंड वेधा (ऋतिक रोशन) यांची कथा आहे. दोघांमध्ये उंदर-मांजराचा खेळ सुरू असतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.